सुख-दुःख ओंजळीत वेचित गेलो
सुख-दुःख ओंजळीत वेचित गेलो
🌹----------------------🌹
🌹👏🌹👏🌹👏
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
काल गुरुवार होता!मनातला उपवास होता!पोटासाठी श्रद्धेतून उपवास होता!काही शिकण्याचा होता!मनाला शिकविण्याचा होता!पवित्र फुलं वेचण्याचा दिवस होता!फुलं श्रद्धापूर्वक वाहण्याचा दिवस होता!आपलं संपूर्ण आयुष्य शिकवणी असतें!थोडं देण्याचं खूप काही घेण्याचं असतं!अनुभवांची पुंजी म्हणजेचं जीवन असतं!अनुभव गुरू असतो!शिकण्याचं दान आयुष्यभर स्वीकारत असतो!शंभर टक्के घेत असतो!काही देत असतो!त्यातील पाच टक्के कळत असतं!म्हणून आपण घडत असतो!👏
बंधु-भगिनींनो!
काल गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत!२४-२५ तासात दिवसभर मी माझ्या मित्रासोबत!श्री उदयभान पाटील साहेबांसोबत पिंपरी-चिंचवडमध्ये फिरून खरोखरच जगणं शिकून आलो!अनुभवांची अनुभूती घेत होतो!माणूसपण शिकत होतो!शिदोरी ज्वलंत होती!भक्कम होती!
सुख-दुःखाची जाणीव शिकत होतो!👏
एखादया ठिकाणी सुखाची हलकीशी झुळूक मनाला स्पर्शून गेली होती!तर कुठे वेदनेनें मन हळहळले होते!काळीज हेलावले होते!डोळ्याच्या कडा भिजत गेल्या होत्या!पाणावल्या होत्या!दुःखाची किनार मनाला चटका लावून जाणारी होती!गुरुवारची संध्याकाळ पावसाच्या रिमझिम सरींनी भिजवत राहिली!मानवी जीवनातील जगण्याचा अर्थ ही सांगत गेली!वास्तव शोधित गेली!माणसाचं वास्तव अस्तित्व सांगत गेली!आम्ही शिकत होतो!अनुभवत होतो!वास्तव वेचित होतो!कुठे सुखावून गेलो होतो!तर कुठे दुःखाने!वेदनेने आतल्या आत हळहळलो होतो!👏
मानवी जीवन सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका खेळत असतं! जगणं पुढे सरकत असतं!सुख स्वर्गाहुनही जिवलग असतं!आनंद देत असतं!आपलं हक्काचं असतं!मन मोहित करीत असतं!आनंद देत असतं!आपण ही क्षणिक सुखात!आनंदात स्वतःला झोकून देत असतो!चिंब भिजत असतो!वाहवत जात असतो!आपण सुखासाठी धडपडत असतो!जगत असतो!सुख घोड्यावर स्वार झालेलं असतं! आपण त्याच्या पाठीमागे लागलेलो असतो!घोड्याच्या लाथानी घायाळ होत असतो! जखमी होत असतो!तरीही वेदना सहन करीत पळत असतो!👏
दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होतोआधार देत असतो!सांत्वना देत असतो!ते दुःख परकं वाटत असतं!...जेव्हा ते स्वतःवर कोसळत...ते दुःख अतिशय वेदनादायी असतं!काळजाला जखमी करीत असतं!अस्तित्वहीन जीवनाची कल्पना देत असतं!तीव्र वेदनेने घायाळ असतो!स्वतः व्यक्ती आणि संपूर्ण घर कोलमडून पडतं असतं!ते असह्य असतं!ओल्या दुःखास तप्त आसवांनी अंघोळ घालीत असतो!असह्य वेदनांनी ते दुःख कोरत अजून घायाळ होत असतो!कधी कणखरपणातून दुःख पांघरीतं असतो!आपलं जगणंचं व्यर्थ आहे अशी जाणीव होत जाते!"आपले कोणीही नाही!जगणं व्यर्थ आहे!"स्वकीय!आप्त!घरातला आधारवड आपल्या पासून दूर निघून गेल्यावर!"जगणं म्हणजे काय असतं!" याची जाणीव होतें! आपण एकटेपणाच्या मानसिक द्वंद्वाशी खेळू लागतो!👏
बंधू-भगिनींनो!
तरीही जीवन थांबत नसतं!दुःख कवटाळीतं किती दिवस बसणार?ते झटकून नव्या उमेदीने!नव्या उभारीने पुढे सरकत राहावं लागतं असतं!आजारपण मरणासन्न असतंचं!असहनिय असतं!नकोस असतं!तरीही ते का कुणास ठाऊक न सांगता वाढून येतं असतं! बळजबरी घरात घुसत असतं!दवाखाना कुणाला सुखावह असतो?...कदापि ही नाही!या करोना काळात कोणी स्वतः आजारी होता!तर अनेक घरातील आधारवड करोनामुळे आप्त स्वकीयांना पोरके करून माघारी परत न येण्याच्या मार्गावर निघून गेलेतं!माणुसपण हरवून!हळवेपण मागे ठेऊन!हक्काची!रक्तातील नात्यातील माणसं काळाने हिरावून नेलीत!काहीजन दवाखान्यात निकराची झुंज देत! लढाई जिंकत!सुखरूप घरी आली!...अजून शारीरिक!मानसिक!आर्थिक परिस्थितीनेंही खिळीखिळी झाली असतील!पण जिवंतपणाची जाणीव!त्याची किंमत पैशात मोजता येणार नाही!एवढी मोठी हानी झाली!जीव अनमोल आहे!जीवन अनमोल आहे!जगणं त्याहून श्रीमंत आहे!जीव आहे म्हणून सर्व काही आहे!अन्यथा सर्व मिथ्या आहे!👏
करोना आला!आपल्या बांधवांच्या हृदयाला असह्य वेदना देऊन गेला!...काहींच्या दुःखाने परिसीमा गाठली होती!जीवित हानी देखील झाली!डोळ्यासमोर आप्त स्वकीय निघून गेले!ही हानी कधीच भरून येऊ शकणार नाही!करोनामुळे घरातील गेलेली व्यक्ती आपल्या जगण्यात पोकळी निर्माण करून गेली!क्षणक्षणातील आठवण मागे ठेवून गेली!काहींना मानसिक धक्का बसला!काही त्यावर मात करीत सावरताहेत!अशा बांधवांच्या वेदनेवर थोडी जरी सांत्वनेची फुंकर घालावी!आपुलकीने विचारपूस करावी!त्यांच्या डोळ्यातील आसवांचे थेंब थोडे तरी वाटून घ्यावेतं!अश्रू थोडे तरी पुसावे!त्यांच्या मनातील दबलेला हुंकार बाहेर काढावा! त्यांचे ते अनमोल घायाळ अश्रू आपल्या ओंजळीत घ्यावेत!त्यांचं मन हलकं करावं!दुःख भरून येणार नाहीचं!पण त्यांनी जे सहलेलं आहे त्या वेदनेला हळुवार हलके करीत स्पर्श करावा म्हणून त्या स्नेहीजनांच्या घराचा दरवाजा आम्ही कालच्या दिवशी ठोठावला होता!............👏
🌷🌹🌷🌹🌷🌹
रमेशजी सोनवणे!..जिवलग मित्र!चिखलीतं वास्तव्याला असणारे मित्र!गेल्या काही दिवसांपूर्वी वडील आणि आजींचं छत्र हरपलं!स्वतः दिड महिने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये यशस्वी लढा देतं हा वीर योद्धा घरी आला!आत्मबल काय असतं ते त्यांच्या कडून शिकायला मिळालं!त्यांचा विजयी चेहरा आलेल्या प्रसंगावर मात करण्याचा संदेश देत होता! जगण्याचा मार्ग दाखवत होता!कुठल्याही परिस्थिती खचून न जाता "आपण जिंकूच"हा वीर भाव आम्ही श्रद्धापूर्वक त्यांच्याकडून ग्रहण केला!त्यांच्या चेहऱ्यावरील ते विशिष्ठ तेज प्रत्येकाला शिकवणं देत होता!त्यांना मनोमन नतमस्तक होत गेलो!त्यांना पुढील शंभर वर्षासाठीच्या शुभेच्छा देत निरोप घेतला!ते ही टेलको कंपनीत सेकंड शिपटला निघूनं गेले!जीवन म्हणजे काय आरसा दाखवून गेले!🌷
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
......प्रदीपजी देवरे!..स्नेहीजन!आप्त!सर्वकाही!पी एम पी एल मध्ये सर्व्हिसला!सध्या पिंपरी-चिंचवडमहानगर पालिकेच्या बालेवाडी कोवीड सेंटरला कार्यरत!..मनाने अंतर्बाह्य मोकळा ढाकळा!माणुसपणाचा अतिशय उत्तम नमुना!..प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावपळ करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व!....वडील गावाला तापाने आजारी पडले!पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले!....प्रयत्नांची पराकाष्ठा करीत वडिलांचा जीव वाचावा म्हणून जे जे काही करता येईल ते ते केले!प्रचंड धावपळ केली!तरीही ऑक्सिजन लेव्हल वाढली नाही!प्रयत्नांची पराकाष्ठा अपयशी झाली!प्रदीप अंतर्बाह्य कोलमडून पडले होते!...जेव्हा आपल्या हाती काहीही शिल्लक रहात नाही!तेव्हा परमेश्वराची कृपेची अभिलाषा असते!बऱ्याच गोष्टी ईश्वरावर सोडून द्याव्या लागतात!पण काळाने हिरावून नेले!वडील गेल्याचं दुःख काय असतं!ते फक्त त्याचं व्यक्तीला कळतं ज्यांच्या घरात दुःख असतं!..प्रदीप!.... वडिलांच्या दुःखद निधनाने हळूहळू सावरत असताना ते स्वतः आजारी पडले!निकराची यशस्वी झुंज देत काही दिवसांपूर्वीचं दवाखाण्यातून घरी आले!काही दिवस गावाला राहून जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी रावेतला आपल्या घरी आलेत!पण वडील गेल्याचं दुःख!आणि त्यातून सावरत असणारा हा तरुण!त्यांच्या चेहऱ्यावरीलं हावभाव बरेच काही सांगून गेले!कोवळ्या वयातील थोराडपंण डोळ्याला स्पष्ट दिसत होते!आपोआप आमच्या ही डोळ्यांत अश्रू तरळले होते!आम्ही ते लपवित!त्यांना शब्दांचा आधार देत होतो!जीवन जगण्यातील अनेक अनुत्तरित प्रश्न घेऊन बाहेर पडलो होतो!..तो तरुण दुःखातून मार्ग काढीत!पुढे सरकत आम्हाला ही जगणं शिकवून गेला!🌹👏
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
.....बंधू-भगिनींनो!
असह्य दुःखाचे क्षण अंतरंगात ठेऊन पुढे चालते झालो!कधी सद्गदित झालो!कधी आधार झालो!.....
👏👏👏👏🌷🌷🌹
....देविदास दशरथ माळी रावेत येथे राहायला!....त्यांच्या मुलांचं नुकतंच!...दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं!...लक्ष्मी-नारायणाचा जोडा पाहून मनोमन सुखावलो!आनंदित झालो!....उभयतां नवदाम्पत्यास आशीर्वाद देऊन!...पुढे मार्गस्थ झालो!...जीवनाचे खेळ अनुभवत होतो!सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर आपलं अस्तित्व शोधीत होतो!सुखाने!आनंदाने हुरळलो होतो!शिदोरी शोधत होतो!दोरी शोधत होतो!माझं मी पन गळत होतं!माझं समाजातील स्थान नगण्य आहे याची जाणीव होत गेली!शुद्रपणाच अस्तित्व दिसत होतं!....सुख दुःखाच्या खेळातील पटावर नाचत होतो!लांब दोरीची शिदोरी किती आहे याची चाचपणी करीत होतो!..मनोमन माझ्याच जन्म ते मृत्यपर्यंतचं अंतर मोजीत होतो!🌷👏
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
.....२३जून२०२१!मी रात्री धुळ्याहून निघालो होतो! त्याचं दिवशी धुळ्यातील एक अंत्यविधी आटोपून भोसरीतील रामभाऊ सोनवणे परिवार धुळ्याहूनचं भोसरीसाठी परतीच्या प्रवासाला निघाली होती!मालेगावला जेवण आटोपून मध्यंतरी एका ठिकाणी आपली अल्टो गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन आराम केला!...पुन्हा भोसरीसाठी प्रवास सुरु झाला!...अन..अन....... संगमनेरच्या आधीच ओव्हरटेक करीत जाणाऱ्या स्वीप्ट् गाडीने सोनवणे बंधूंच्या गाडीला धडक दिली!👏
अँकसिडेंट अतिशय भयानक होता!गाडीची अवस्था पाहून कोणीही अंदाज व्यक्त करू शकला असता!वडील(दादा),अनिल सोनवणे,भावजयी यांच्याकडे पाहून परमेश्वराचे शतशः आभार मानावेतं!"देवा जखमी वेदना झाल्या तरी जीवन दिले!"आस्था हॉस्पिटलमध्ये दादांचा८२वाढदिवस साजरा केला!अन कालच अनिल सोनवणे यांनी हाल्फ सेंच्युरी मारली!पन्नासावा वाढदिवस साजरा केला!शरीरीक जखमा सहन करीत हा परिवार उभा आहे!...रामभाऊ जिभाऊ आणि लक्ष्मण सोनवणे यांनां थोडं कमी लागलंय!...ईश्वर कुठेतरी असतो!पुण्य कर्मात असतो!सद्विचारातं असतो!आचारात असतो!कुठल्यातरी स्वरूपात असतो!त्याचं अस्तित्व असतं! म्हणूनच संपूर्ण सोनवणे परिवार त्या भयंकर अँकसीडेंट मधून बाहेर पडला!पुढील सत्कर्मासाठी जीवन दोरी बळकट करीत गेली!आपणास हार्दिक शुभेच्छा!🌷
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
..त्यांना भेटून रात्री उशिरा नऊ वाजता भोसरीतील श्री नवल खैरनार यांच्या घरी पोहोचलो!त्यांचा मुलगा गौरव!नावाप्रमाणे गौरव!गौरव म्हणजे पुरस्कार!तो मेडिकल येन्ट्रन्सची तयारी करतो आहे!त्याच्याशी बोलतांना आम्ही स्वतःचं अस्तित्व विसरलो होतो!एवढ्या कमी वयात ज्ञानसागर सारखा वाटला!त्याच्यातील आत्मविश्वास आम्हाला या वयात देखील मार्गदर्शक वाटला!गौरव एक एक मोती वाटत होता!...आम्ही आधाशीपनाणे ते ज्ञानमोती ग्रहण करीत होतो!सलग एक तास!..आम्ही मोहित झालो होतो!...त्याच्या विचार कनांनी श्रीमंत होतं आम्ही काल गुरुवारी रात्री उशिरा हडपसरला मार्गस्थ झालो!👏
सुख-दुःखाच्या अनमोल क्षणांनी खूप काही शिकवलं!आपली माणसं!...आपलीच वाटली!आपलीच होती!जीवनानुभव देऊन गेली!सुखा सोबत अश्रूंना देखील रस्ता देत गेली!🌷👏
------------------------------
🌹👏🌹👏🌹👏
----------------------------------
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१६जुलै२०२१
Comments
Post a Comment