येथवर पोहोचलो आहे
🌷येथवर पोहोचलो आहे🌷
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
----------------------------------
साठीचा नवा भेटला किनारा
मी नाव वल्हवित आलो आहे
सुख दुःख वेचित वेचित.....
पुन्हा पल्लवित झालो आहे
अंगाने पुरता फाटका होतो
सरळ अर्थाने फुटका होतो
ऊन पावसाळे येऊनि गेले
डोक्यावर बांधीत पटका होतो
जीव टाकणारे भेटले येथे
त्यांचा दास मी झालो होतो
कधी जीव काढणारेही भेटले
तेव्हा मनात उदास झालो होतो
आम्हा हसणे फुकट भेटलेलें
ते विकत घेऊनि जगलो आहे
काट्यांवर उभा राहून सुद्धा
मी माणूस होऊनि वागलो आहे
कठीण क्षण नकोसे झाले ....
मन पिंजऱ्यात कोंडलो होतो
घुसमट जीवाची झाली माझी
मी उसासे टाकीत भांडलो होतो
मागे वळूनि पाहतो जेव्हा....
डोळे ढग घेऊनि येतं असतात
ज्यांचे बोट धरुनी चाललो मी
सारे डोळयांत बसत असतात
एकोणसाठ मोजीत आलो
साठीत आज पोहचलो आहे
ऋणानुबंधांच्या धाग्यांमुळेचं
येथवर मी पोहचलो आहे
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
-------------------------------------
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं- ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
Nanabhaumali46@gmail.com
दिनांक-२२जुलै२०२१
Comments
Post a Comment