गुडीपाडा उना नि पयेत नींघी ग्या
*गुडीपडा उना नि,पयेत नींघी ग्या*
🚩🚩🌹🌹🙏🌹🌹🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
परोंदिन गुडीपाडा इसनी चालना ग्या. सन आनंनन्हा ऱ्हास.घरभार एक व्हयी श्रद्धांतीन सन साजरा करतंस. त्यादिन गुरवार व्हता.यायं उगांमव्हरे झपाटाम्हा धरनीमाय तिन्हा लेकरेस्लें उठाडानं काम करस.त्या दिन सक्कायम्हा यांयं उगी ऱ्हायंता.हेट्या पिव्वे धमक आभराय दिखी ऱ्हायंत. सोनानं रुपडं लेयेंल व्हतं.जो तो आंग धोयीं चोयीं, ज्यानं त्यान्हा दारे-आंगनम्हा धाकल्ला, मोठ्ठल्ला टोकरेस्वर निमन्ह डक्स, फुलेस्नी माय,साखर हाल्लानीं माय, नव्व कापड-साडी नेवनेकटं एकमझार टोकरले गुंढायींस्नी त्यावर तांब्या उफ्फट्टा ठीस्नी तांब्यावर वल्ला लाल भडक कुकुव्हरी स्वस्तिक काढा व्हता.मंग नेम्मन गुंढायीं बांधी,पूजा करीसनी दारभाहेर नेम्मन जागा दखी उच्चीपुरी गुढी हुभी करी व्हती.
घरभार,शेजारे-पाजारे,गल्लोगल्ली गुढया हुभ्या ऱ्हायेल दिखी ऱ्हायंत्यात.बठ्ठा घरें-गाव आनंनंम्हा व्हतातं.सनन्हा आनंन मोजता येत नही इतला मोठा ऱ्हास.घरमां चुलांजोगे पुरणपोई-खीर, कुल्लाया-पापडे, रसी-भात, भज्या, तया-ऱ्हादां-शिजानां नाकले वास यीं ऱ्हायंता. 🚩
गुढीपाडा हिंदूधरमनां सन से.नवा सालनी सुरुवात गुढीपाडाफाइन सुरुवात व्हयीं जास.आम्ही आम्हना दारे गुढी हुभी करीस्नी तींगंम दखत ऱ्हायनूत.गुढी का बरं हुभी करतस व्हतीन?चित्त मांगे मांगे जात ऱ्हायनं.ठाक लागतं ऱ्हायना.श्रीराम-रावण युद्ध व्हयनं व्हतं.त्याम्हा श्रीराम जिकना व्हतात. खरान्ही खोटालें मारं व्हतं.सत्यानीं खोटा नाटालें आड पाडं व्हतं. राक्षसल्हे मारी श्रीराम जिकी गयतात.तव्हयं परजा खुश व्हयनी व्हती,आनंनम्हा व्हती.ज्या ज्या भागतीन श्रीराम अयोध्यालें जात ऱ्हायनात त्या रस्तावर,घरेदारे-गावमा उच्चीतडांग गुढी बांधीस्नी श्रीराम, लक्षुमन,सितामयनं स्वागत करं व्हतं. फुले टाकी गाव सजेल व्हतात. रामराज्यन्ह आगमन व्हयनं व्हतं. परजा खुश व्हती.🚩
बर्रम्हदेवनीं म्हने या स्रिरीष्टीलें जलमल्हे घालं व्हतं,आसी पुरान कथा सांगतंस.त्या स्रिष्टीनां उपकारखाते खुशिम्हा गुढी हुभी करतसं आशी पर्था भी चालत येल से से आसं म्हंतंस.ते काय भीती ऱ्हावो पन गुडीपाडा घरे घर आनंन दि जास.उंडायांनां चटका बठानी सुरुवात व्हयी जास.झाड जुना पांटा गायेत ऱ्हास.नवा डिर फुटी बुर्चायेल, पाने गयेल झाडें आखों नवा कव्याजरत निय्यागार पांटास्वर सजी तयार व्हयी जास.नवा बहार येवानी सुरवात व्हयी जास. स्रिष्टीन्ह नव्व देखनं रुपडं दखत ऱ्हावो आसं ऱ्हास.त्यानां आनंनं छातीम्हा थोडीचं दबेल ऱ्हायी बरं!!नवा बदलन्ह स्वागत करो आसं म्हंतंस.गुढीपाडा उना आनी ग्या पन निमनां निय्या फांट्यास्लें निंबूनीस्ना झूमका दिखना नही.आवल चावलं,वालाफुके वार्ग हेट्या वऱ्हा पयाले सूर्वात व्हयी जायेल से.ऊन चटकाडी ऱ्हायनं. हेरीस्न पानी तयलें भिडी जायेल से.तयन्हा झिरा मुत्र्या व्हयी हेरम्हा पानी वती ऱ्हायनात.खंगयेलं पानी मोट्रा एकचं घोटम्हा व्हडी गुचूप्प बठी ऱ्हायन्यात.आखो कोल्ली हेरमा झिरनीं खय खय आयकाले भेटी ऱ्हायनीं.
गहू, हारभरा, दादरी घरमा यीं लागेल सेतीस.त्या वावरेस्मझार ट्रॅक्टरनां नागर फिरी ऱ्हायना. वावरे तयायी ऱ्हायनात.वरला यांयं ऊन वती ऱ्हायना.बिनभरनंन्ह आऊतनांगत हेट्या वऱ्हा पयी ऱ्हायना.कानीबानी वावटयं घिरक्या मारी येस,वावरम्हा घुसी दखी नींघी जायी ऱ्हायनी. काही तरी बेद करी पयी ऱ्हायनीं. राबनारा कुनबी वावरगंम दखी धर सोड करी ऱ्हायना.वावरना तथानां मेरगंम दखी येणारी आखाजीन्ही वाट दखी ऱ्हायना.खान्देशना नवा सालनी वाट दखी ऱ्हायना.🚩
मी भागबल्ली से!नेम्मन गुडीपाडान्हा दिन खान्देश रतन,कवी सुनील दादा पाटील आनी त्यास्ना पुनाम्हाना पिरंगुटम्हा राहणारा पाव्हना पाटील साहेब यासन येनं झाये.त्यास्लें भेटी माय माटीन्ही याद हिरदले गोड करी गयी.जसं शिरीरामनां पवतीर पाय गुडी पाडान्हा दिन आम्हना घरले सोनं करी ग्यात.मन्ही खान्देश माटीना भावुबंधम्हा या गुन सेतस. नेम्मन गुडीपाडान्हा दिन अहिराणी मायना पालखीना भोईस्ल्हे भेटी जीव गरायी ग्या.हाऊ गुडीपाडा मन्हा मनन्हा देटल्हे निय्यागार पाने चिटकायी ग्या!🚩
*गुडीपाडान्ह्या गहिऱ्या गहिऱ्या शुभेच्छा*🙏🚩
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
मु. पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२१ मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment